कांदा पर्व ! शेतकऱ्यांमध्ये नाराजी ? कांदा निर्यात बंदीचे सर्वत्र तीव्र पडसाद Onion News

कांदा पर्व !बाजार समित्यांमध्ये नाराजी ? Onion News

कांदा निर्यात बंदीचे सर्वत्र तीव्र पडसाद

लिलाव बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प विंचूरवगळता लिलाव बंदच; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘रास्ता रोको’Onion News

Ref. Sakal News नाशिक लासलगाव : कांद्याची निर्यातबंदी केल्यावर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ९ ) कांदा उत्पादक शेतकन्यांची संतापाची लाट कायम होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. ९) नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ‘रास्ता रोको’ करून आंदोलन केले. केंद्र सरकारने त्वरित कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी, अन्यथा नाशिक जिल्ह्यातील एकही किलो कांदा बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान, जिल्ह्यातील विंचूरवगळता सर्व कांदा लिलाव बंद होते. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होती. जिल्ह्यातील १७ बाजार समित्यापैकी. १५ बाजार समित्यांच्या आवारात कांद्याचे लिलाव होतात. मात्र, शनिवारी १५ ही बाजार समित्यांमधील लिलाव बंद होते. केवळ लासलगाव कृषी उत्पत्र बाजार समितीअंतर्गत असलेल्या विंचूर उपबाजारात कांद्याचे लिलाव झाले. यावेळी लाल कांद्याला किमान १०००, कमाल ३०००, तर सरासरी २६०० रुपये दर होते. तर उन्हाळ कांद्याला किमान १०००, कमाल ३५०० तर सरासरी ३१०० रुपये मिळाली. पुन्हा लाल कांद्याचे ३०० रुपयांनी क्विंटलमागे दर वाढलेले होते. कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली दर मिळतात त्यावेळी केंद्र सरकारची कुठलीही यंत्रणा शेतकन्यांना किमान उत्पादन खर्च मिळेल यासाठी पुढे येत नाही. मात्र आवक कमी झाल्यानंतर थोडेफार दर मिळत असतानाच केंद्र सरकार अधिकारांचा वापर करत सातत्याने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांच्या  मुळावर येणारे निर्णय घेत आहे. त्यातच निर्यातबंदीचा निर्णय घेऊन सरकारने आमच्या ताटात माती कालवली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा सूर शेतकर्यांमध्ये होता.कांदा निर्यातबंदीसे ‘कसमादे’त पडसाद मालेगाव केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निर्णयावरून जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर संतापाची लाट उसळली आहे. निर्णयाच्या दुसऱ्या दिवशीही याचे पडसाद जिल्ह्यातील अनेक भागांत उमटले. मेशी (ता. देवळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या या निर्णयाची होळी करण्यात आली. त्यानंतर गिगाव फाटा (ता. मालेगाव) येथे संतप्त शेतक-यांनी अचानक रास्ता रोको करोत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ सोमवारी (ता. ११) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली चांदवड येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

Ref. Sakal News

Leave a Comment