वेळ आणि स्वप्न Time

वेळ आणि स्वप्न

(अपनी किस्मत हम खुद लिखते है)

प्रवेश पहिला

कर्मरहितं स्वप्नम् इच्छा एव केवलम्।

वेळ आणि स्वप्न
वेळ आणि स्वप्न

– A dream without action is just a wish.
( हा प्रसंग/नाटक एका रेल्वे स्टेशन वरील आहे, त्यामुळे यामध्ये भाषेचे कुठल्याही प्रकारे बंधन नाही, लेखक कुठल्याही प्रकारे, कोणत्याही भाषेचा अनादर करत नाही, नाटकाचा उद्देश कोणत्याही धार्मिक, सामाजिक, घटकांना दुखावण्याचा नाहीये,)

लेखक – बागुल दि. ना.

(पडदा उघडतो आणि रंगमंचावर एक रेल्वे स्टेशन दिसत, तिथे जवळच एक चहाची टपरी असते )

पॉम…. पॉम…. झुक झुक झुक झुक चलो डोंबिवली टेंशन झुक झुक…पॉम पॉम श…..

( ट्रेन थांबते )

ट्रिंग…. ट्रिंग….ट्रिंग…. ट्रिंग…चलो चाई…चाई बस 12 रुपये.. चाय चाय उसपर News पेपर फ्री! फ्री! एकदम फ्री! चलो, चाय चाय …

चाईवाला(पपू मलिक ) :- अरे ! समय जा जल्दी ट्रेन निकल जायेगी, और हा, पैसे लेणे मत भुलणा,

समय :- अरे हा शेठ, घेतोय ना कायको टेन्शन लेता है,

चाईवाला(पपू मलिक ):- हा! हा! चल! निकल,

(नेहमी प्रमाणे समय आकाशातून जाणार विमान बघण्यासाठी, ट्रेन च्या ही आधी फक्त विमान बघण्यासाठी पळत सुटतो, )

चाईवाला(पपू मलिक ):- अबे क्या रे! समय, इस बार भी चाई गिराके आयांना तू, तू सुधरेगा नही.

समय :- यार नही ऐसा कुछ नही हें, मी जेव्हाही त्या विमानाला बघतो ना, मी कावरा बावरा होतो, आणि त्या विमानाच्या देशेने पळत सुटतो,

स्टेशन मास्तर:- ( समजावत )आर जाय कि मग पोरा! अडवलंय कोणी तुला, त्याच्या साठी तुला भरपूर अभ्यास करावा लागेल, आणि खुपाच संघर्ष करावा लागेल

कुली :- ओ सर कशाला मुलाला बिघडवतात, जे करतोय करुद्या त्याला, हें जग लईच वाईट आहे, त्यात याचा ठावठीकांना कुठे लागणार, आम्ही असचं बरे आहोत, आणि हेच आमचं जीवन, समय च्या हातात चहा, आणि माझ्या हातात हें रोजच कबाडं!

ह्या समाजाने आम्हाला हें करण्यास भाग पाडलंय, आता हेच आमचं जीवन! आणि हीच आमची लायकी!

स्टेशन मास्तर:- तस काहीही नाहीये, ही तुमची विचार सरणी आहे, गरीब घरात जन्म घेणं ही तुमची चूक नाहीये पण त्याच गरिबीत मृत्युंला अलिंगण देणं हें घोर पाप आहें, समय श्रीमंतीचा, प्रगतीचा, शिक्षणाचा हक्क तुलाही आहे, तू तुझा वेळ असा व्यर्थ पणाला लावू नकोस.

चाईवाला(पपू मलिक ):- सर मे आपकी बोहोत रिस्पेक्ट करताये, कुली बोला वो भी गलत नही हें, दोनोंही अपने नजरीयेसे बोहोत सही हें, सर अगर मे इस चाई के ठेले पर ना होता, तॊ मे भी एक इंजिनिअर होता, पर किस्मत मुझे कहा ला कर आ गयी, अब यही मेरा जिंदगी हें सर,

एक दिन ऐसेही दुकान पर था और हें लडका थंड मे कांप राहा था, उसको पूछा तू उसने खुदको अनाथ बताया , इस दुनियां में उसका कोई नहीं था, बस हाथ में एक उड़नखटोला था, उसी वक्त मेने उसे अपने साथ रख लिया, सर उसके सपने बोहोत बड़े है, पर उसको अंदाजा भी नहीं की उसके रास्ते में और कितने गिध और बास आयेंगे

सर जिंदगी में जभी मुझे मौका मिलेगा, मैं उसके लिए कुछ ना कुछ जरुर करूंगा

मध्यंतर…….


प्रवेश दुसरा
समय :- यार मन्या, हें विमान कसं, उडतंय रे,?

मन्या :- अरे तेरेकु नही मालूम, मेरे अब्बा कहते है, की उसे पायलट चलाता है,

समय:- अच्छा!!

समय:- आपन त्यावर प्रवास करू शकतोय का?

मन्या :- अरे कर सकते ना, पर उसके लिए पैसा लगेगा, और कुछ ID वगैरा लगता है, पर हमे नहीं जाने देंगे उसमे, उसमे सिर्फ बड़े लोग जाते आते है, अपनेलिए तो ट्रेन ही काफी हैं, चल

समय :- यार मन्या मी एक दिवस खूप मोठा, व्यक्ती होणार आणि त्या हवाईजाहजाची सफर करणार

मन्या :- अरे करेगा ज़रूर करेगा, तेरा तो नाम भी समय है, तू तो खुद समय कोभी बदल सकता है

और याद रख समय, हम अपनी किस्मत खुद लिखते है, उसके लिए किसी भगवान के दर जाकर भिक नहीं मांगनी पड़ती, अगर भीक मांगनी है तो खुद से मांग, क्युकी तेरा भविष्य खुद तू है, क्युकी तू अपने आप मेही एक समय है…..

निवेदक :-

हें नाटक एका होतकरू मुलावर आधारित आहे, ज्याचं नावच समय आहे. आपण सर्व स्वप्न बघतो, तसेच प्रत्येकाची स्वप्नही वेगवेगळी असतात, स्वप्नांना मर्यादा नसतात, खरंय! पण ते त्या त्या वेळेपूरता मर्यादित सुद्धा असतात, स्वप्नांचाही एक कार्यकाल असतो, जेव्हा तॊ कार्यकाल संपतो तेव्हा आपली स्वप्नही संपतात, आपल्याला जीवन हें अगदी लिमिटेड मिळालं आहे, अनलिमिटेड मिळालं असत तर आपली life काहीतरी वेगळी राहिली असती

पण त्या लिमिटेड लाईफ मध्ये ती स्वप्न पूर्ण करणं हा पण एक टास्क आहे, ज्याने तॊ टास्क पूर्ण केला तॊ झाला यशस्वी.

ह्या नाटकातून थोडक्यात हेच दाखवण्याचा प्रयन्त केलाय, यामधील चाय वाला पपू मलिक, यांनीपण स्वप्न बघितलं, पण ते वेळीच पूर्ण न झाल्यामुळे ते स्वप्न अपूर्णच राहील, काहीकाही वेळेला आपण आपल्या परिस्थिती नुरूप हताश होतो, पण जीवन जर सहज सोपं आणि सजग राहील असत, तर जीवनाची व्याख्याच बदलली असती…असो

पण यामधील समय नावाचा मुलगा, त्याच्या परिस्थितीलाच जुगारून लावतो, जमिनीवर पाय रोवून, आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न बघतो. असो,

हेच तर आहे जीवन, समय ने आता स्वप्न बघितलंय आणि ते स्वप्न तॊ पूर्णही करणार कारण त्याला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मोठा कार्यकाल आहे, आणि तॊ ते यथोचित पूर्णही करेल,

जीवन बदलत जेव्हा, जीवनाच्या स्टेशनं वर, एक मार्गदर्शक म्हणून स्टेशन मास्तर मिळतो.. आणि तॊ आपल्या जीवनाचा प्रवास निश्चित करतो,

आरंभ – 26- जानेवारी -2022

दिगंबर बागुल

नाशिक महाराष्ट्र

मो. नं.-7218836601

ई-मेल – [email protected]

मी आणि भारत

एक प्रवास ( भाग १)

Leave a Comment