विठ्ठलाचा संप! Vitthalacha Samp Natak Mandali

विठ्ठलाचा संप!

विठ्ठलाचा संप! Vitthalacha Samp ! Natak Mandali

विठ्ठलाचा संप! Vitthalacha Samp Natal Mandali
विठ्ठलाचा संप! Vitthalacha Samp Natal Mandali

विठ्ठलाचा संप!

(प्रस्तुत लेखन हे पु. ल. देशपांडे यांच्या विठ्ठल तो

 आला आला ह्या नाटकावार प्रेरित आहे)

              “ आषाढी एकादशी किंवा शयनी एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण भगवान विष्णू योग निद्रा, मानसिक विश्रांतीची स्थिती प्राप्त करतात असे संबोधले जाते . हा काळ भगवान विष्णूच्या गाढ निद्रेत जाण्याचा आरंभ दर्शवितो…असो

( एक जुनाट अगदी जीर्ण अवस्थेतलं मंदिर…जीर्णोद्धाराची वाट बघत ; पन जीर्णोद्धार च काय तर….. विठ्ठलही वैतागला म्हणायचा!.. सारखं सारखं पुसून पुसून मूर्तीसुद्धा रंग टाकायला लागली आता…मूर्तीच्या कडेला फक्त तेवढा तो चिमुकल्या मुग्यांचा काफीला…वाखांन्या जोगा आहे….विठ्ठला जवळचा पसारा तरी चिमुकल्या हातांनी आवरतात असो.)

रामा :- आरं व्यंकटेशा.. आरं चाल कि बाबा.. आज आषाढी एकादशी.. तुला यायचं नव्ह देऊळात.

व्यंकटेशा :- व्हय आलोच!

(तेवढ्यात सर्व गावातील मंडळी देऊळाकडे जाण्यास निघतात.. त्यात गावातील काही स्त्रिया, चिमुकली मुले, गावाचा अढीदार सरपंच.. सरपंचांची कारभारीण(देवका) – आणि त्यांचं गोंडस मुल (दिगंबर)- गुरुजी – पत्रकार – गावातील वयोवृद्ध म्हातारा – एक नवीनच लगीन झालेलं जोडपं – इ. रस्त्याच्या ऐकेरी वाटेने पायपीठ – गप्पा – गलगल करत देऊळाच्या दिशेने निघतात.)

तेवढ्यात एक तरुण पोरगं झाडाच्या गुंथ्याला बसुन काहीतरी बडबड करत होत, जणू काही तो त्या झाडाशी बोलतोय असं काहीस हे दृश्य – अगदी 15 – 16 वर्षाचं; पन त्याच्या वयाचा अंदाज घेणं अवघड, मस्तकावर विठुरायासारखा तिलक….डोक्यावर एक जुन्या परंपरेची अर्थात जमाण्याची पगट,…तेवढ्यात गावातील एक मंडळी.. त्याची विचारपूस करते  आता पुढे –

रामा :- आरं पोरा येडा का खुळा तु.. काय त्या मेलेल्या झाडाशी बडबडतोयस…आरं जीर्ण झालं कि ते, आरं जोराची हवा बिवा आली तर.. एखादं फाटक पडायचं तुझ्यावर…चल उठ!

व्यंकटेशा :- आरं बाबा कोण ह्यो?.. कंदी बघितलं नाय गावात. – तेवढ्यात सरपंचांची कारभारीण अर्थात देवका समोर येते

देवका :- अयो बया.. अवो मी तर ऐकलंय…कि पोरं पकडणारी टोळी सुटलीये गावात…आरं काहीतरी लालूस देऊन पोरं पळवित्यात म्हणं ही भामटी लोकं!

सरपंच :- अगं अय कारभारीण…सरपंच मी नव्ह मले इचारू देकी! – काय रं इकडं कुठं निघालायसा.. ओळख काय.. तुझा बा च नाव काय?..आरं बोलत का न्हाहीस…आरं साप सुंगला कि काय तुला…आरं गावचा पाटील हाय मी पाटील! इथं बसण्याअगोदर…वाड्यावर अलतास का? फर्मान घ्यावा लागतो आमचा!

(तो तरुण आपला त्या झाडाशीच बडबडत असतो…सरपंच्याच्या अर्थात.. गावातील मंडळीच्या बोलण्याकडे त्याचं तीळ मात्रही लक्ष नसत…. तेवढ्यात.. कोणीतरी.. पुंढलिक वर्धा हरी विठ्ठल….श्री ज्ञानदेव तुकाराम! अशी गर्जना करत..

हे आवाज एकटाच.. तो तरुण काढाडून उठतो…आणि कंबरेवर हात ठेऊन…त्या आवाजाच्या दिशेने.. आवेश करतो…

तो तरुण :- अरे नाव.. नको काढू त्या पुंडलिकाच.. त्याच्या ह्या इटेमुळे.. युगे आठ्ठवीस मी उभा आहे…याची काय ती सेवा पूर्णच होत नाही!.. आणि हो अरे आजच्या दिवस तरी विश्रन्ती द्या मला…दररोजच्या तुमच्या ह्या घंटा नादाला कंटाळलोय मी!

रामा ( आणि सर्व मंडळी त्याच्याकडे पाहते…)

रामा :- आरं काय वंगाळ बोलतुयस.. बरं जाऊदे…नाव काय बा तुझं.. आई वडील नाय का तुला.. असा एकला का बसलायस इथं!

तो तरुण :- मी विठ्ठल!..

 रामा :-…अन तुझा बा च नाव?.. जात काय तुझी..- देशमुख – पाटील – शास्त्री – इ. काहीतरी कुळ असलं ना!

विठ्ठल :- नाही फक्त विठ्ठल!..

रामा :- आणि जात?

विठ्ठल :- ते काय असतं…

रामा :- आरं तुझ्या बा नी सांगितलं न्हाय का तुला?

विठ्ठल :- नाही! आता मी त्याच्याच तर खाली बसलोय!

रामा :- हे जीर्ण झालेलं झाड तुझा बा हाय?

विठ्ठल:- हो

देवका :- अगो बया काय वंगाळ बोलतोयस…तुला झापटलं तर नाय ना कोणी……हे बघ खरं खरं सांग…कोन आणि कुठचा तु?… गावातल गावपन नाडायला तर नाही आलास ना?

सरपंच :- अगं कारभारीण सरपंच मी नव्ह.. मला बोलू देकी.. (मिशीला ताव देत) आरं कोण तु…आता शेवटल विचारतो तुला!

विठ्ठल :- विठोबा – विठुराया – पांडुरंग -किंवा पढरीनाथ…काहीही म्हणा.. शोभतंय मला…. तुम्ही ज्याला भेटायला चाललात तोच हाय मी…विठ्ठल.. जो युगे आठ्ठवीस.. तुमच्या भल्या साठी उभाय!… अरे एवढ्या दिवस माझ्या सानिध्यात राहिलात.. माझी ओळख पटत नाहीका?

रामा :- तु आणि विठ्ठल? आणि तोही…इटेवरचा सावळा?…(हसतो )

विठ्ठल:-  होय!

रामा :- मग मी शेषणाग हाय!

व्यंकटेशा :- रामा मग मी हनुमान…जय श्री राम!

विठ्ठल :- अरे आधी आहे त्या भूमिका.. व्यवस्थित करा.. देवासारखं देवपन.. त्यापेक्षा अवघड काम नाही!.

पत्रकार ( पत्रकार मात्र हे सर्व निमूटपने पाहत राहतो)

गुरुजी :- देव! देव काय असा असतोय… सुंदर ते ध्यान । उभे विटेवरी ।। कर कटेवरी । ठेवोनिया ।।…असा असतोय विठ्ठल…

विठ्ठल :- अरे हो! म्हणजे तुम्ही परिस्थिती नुसार बदलावं, देणाने नाही का?… तुम्ही दगडाला देव मानावं, देवाने ह्या जीर्ण झाडाला नाही का?…. देवाचं स्वरूप तुम्ही बघाल तसेच तुम्हाला दिसेल…माणसातला देव तुम्हाला कधी दिसला नाही! आणि देवातलं देवपण शोधायला लागलेत…

(तेवढ्यात सरपंचांचा चिमुकला मुलगा मागून धावत येतो.. आणि त्या विठ्ठला कडे आश्चर्यने बघतो )

दिगंबर :- अरे विठ्ठल तु! तु इथे कसकाय…आता तर मी तुलाच भेटायला येत होतो?

सरपंच :- तु ह्याला ओळखतॊस?

दिगंबर :- होय बाबा! ( आम्ही दररोज देऊळात खेळ खेळतो…तेपण सर्व गेल्यावर!

वयोवृद्ध :- गळा खाकरत.. खं…खं…खं.. आर निर्लज्जवो.. मले दिसलं…ह्या छोट्याले दिसलं ते.. तुमले दिसलं नाही व्हय…आर खरंच देव हाय त्यो….बाबा पांडुरंगा.. जन्मदात्या.. इट काय करतूयसा…तुला भूक लागली असणं नव्ह!.. हे बघ तुलाच दही बांधून आणलीये…यास्नी काय कळत.. गावाच्या बांदावरून जीव घेणारी ही लोकं…पोटच्या भावाला ओळखीत नाय.. तर तु तर लांबच हाय रं बाबा!! जा तुझा तुझा देऊळात…

पत्रकार :-…असं कोणीपण उठून सुठून येईल आणि स्वतःला देव.. म्हणून संबोधित करेल.. आणि आम्ही विश्वास ठेवायचा…मी अंधश्रद्धा निर्मूलनाचा अध्यक्ष आहे….आताच याची उचलबांगडी करतो.

मास्तर :- तु खरज देव आहेस तर सिद्ध कर तुझं देवपन!…

देवका :- हो खरंय…

रामा :- हा काय सिद्ध करणार…. मला तर बहुरूपी वाटतोय? भामटा

व्यंकटेश :- देव आहेस तर सिद्ध कर!!!

सरपंच :- व्हय!

वयोवृद्ध :- विनाश काळ विपरीत बुद्धी! असो

दिगंबर :- अहो माझा मित्र आहे तो..

विठ्ठल :-…चक्क देवाचीच परीक्षा.. तर. मग ठरलं…मी सिद्ध करतो माझं देवपन.. आणि तुम्ही तुमची भक्ती..

(विठ्ठल काडडून उठतो.. कंबरेवर हात ठेऊन त्या जीर्ण झालेल्या झाडाला स्पर्श करतो..)

वयोवृद्ध :-  ंढरीचा महिमा। देतां आणिक उपमा।।

ऐसा ठाव नाही कोठे । देव उभा उभी भेटे।।

आहेती सकळ । तीर्थें काळे देती फळ।

तुका म्हणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ।।

बघता बघता.. ते जीर्ण झालेलं…झाडाच अवशेष, नवं तरुणांईन.. फुलत होत.. हिरवी हिरवी.. पालवी जणू.. नवं शिशू सारखी खिदळत होती.. झाडाच्या वाळलेल्या फ़ांद्या; हिरव्या पालवीने नटत होती.. जणू काही देवाला माणवंदना करत होती…झाड आता पूर्णपणे हरित पालवीने नटले होते…जागेवर हवेच्या झूपक्या ने जणू…देवापुढे नृत्य करत होते…असो..

–        सर्व आश्चर्याने त्या दृष्याकडे एकटक बघतच होते…पडदा हळू हळू मागे येतो…आणि विठ्ठलाच्या अवती भवती लख्ख प्रकाश पडतो…..

देवका :- अगं बया…हे काय व्हतं.. म्या ते हेपनोटाईझ तर न्हाही झाली ना.. हा कुणी जंतर मंतर वालाचं दिसतोय…आता गावाचं काही खरं न्हाही!

मास्तर :- आओ मॅडम हेपनोटाईझ नाही Hypnotize  असतं ते!

देवका :- हो त्योच म्हणलं मी पन!

वयोवृद्ध :- आर आता इश्वास पटला काय? हाच हाय माझा विठुराया! आता हाय का काही शंका ( पुढे जाऊन )

पत्रकार :- (पाठीवरून आपली sac ओढत ) होय शंका तर आहे.. आणि त्याचं निरसन पन मीच करणार!..

विठ्ठल :- काय अजून पन विश्वास पटत नाही?.. काय सरपंच – काय मास्तर – काय पत्रकार – काय मंडळ..
चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूतिऩ विठोबाची ॥1॥
चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥2॥
एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥3॥….. असो

सरपंच :- असं काही सांग जे फक्त आम्हालाच माहित हाय…दुसरं कुणालाच नाही.. मग मला पटल कि तूच देव हाय म्हणून…

देवका :-(कानात कुजबुजत ) आव धनी…हे बोलतायसा.. त्यानी जर तेपण सांगितलं तर पुढच्या पाचवार्षिक मध्ये तुमचं तिकीट गेलं कि समजा..

सरपंच :- (कानात कुजबुजत )अहो सरकार.. सरपंच मी हाय नव्ह…मला बोलू द्याकी…. आता सापडवतो म्या ह्या बहुरूप्याला बघा!

विठ्ठल :- असं व्हय!

विठ्ठल :- बरं सरपंच… देऊळाच्या उंबरठ्या खाली.. दोन वर्षांपूर्वी खोदकाम केलं होत तुम्ही तिथे काहीतरी चमचमत होत म्हणतो….

सरपंच :- (अचंबित ).. गडबडून जातो.. भीतीने घामेघाम होतो!

बस…बस देवा माफ करा.. वळखलं तुला…मी मानतो तूच हाय विठ्ठल

विठ्ठल :- मास्तर शाळेतल्या.. कपाटाखाली.. गोडवा आहे म्हणतो!

मास्तर :- भीतीने कासावीस होतो…म…म…म… विठ्ठला….!

विठ्ठल :- रामा .. दूध पातळ हाय म्हणतो…पन सारं पाणीच कि रे!

रामा :- (तोंड लपवत ) सरपंचा मागे

विठ्ठल:- पत्रकार (सायंपा) नव्हत्याच होत कोणी केलं बाबा.. अंधश्रधेचा आड किती देऊळ फस्त केली बाबा?

पत्रकार :- गप्प! (नजर झुकवून ) विठ्ठलाला हाथ जोडत

विठ्ठल :- देवका….

देवका :- माफ कर विठ्ठला.. म्या आताच्या आता जाते आन…आन ते पैसं परत करते?

सरपंच :- कोणतं पैसं?

विठ्ठल :- देवका मी तर काही बोललोच नाही!

वयोवृद्ध :- आर आता इश्वास पटला का?… आर हाच माझा देव हाय…आर तुम्ही फक्त मंदिरातल्या देवालाच पूजलं रं…माणसातला देव पूजला असता…तर माह्या विठ्ठल तवाच.. ओळखला असता..

देवा तु माझ्या घरला चाल…मी तुला जेऊ घालतो…तुझा पाहुणचार करतो.. चल

सरपंच :- अय म्हाताऱ्या…सरपंच मी नव्ह.. माझ्या घरी येणार देव.. मी पाहुणचार करतो!

रामा :- नाही नाही! जमणार नाही! सरपंच हाय म्हंजी देवपण तुमचाच का? मी घेऊन जाणारा विठ्ठलाला माझ्या घरला!

व्यंकटेश :- व्हय! म्या नेणार

मास्तर :- मी नेणार.. खरी ज्ञानाची शिदोरी माझ्या कडे आहे, म्हणून मीच नेणार!

पत्रकार :- ते कोण्हा बरोबरही जावोत.. पन माझ्या घरी तर मी घेऊनच जाणार…आज नास्तिक आस्तिक होणार.. म्हणून देव माझ्याकडेच येतील!

दिगंबर :- थांबा थांबा.. हे काय चालवलाय.. आम्ही खेळायला जाणारोत आता!!.. चल विठ्ठला..

(सर्व गावातील मंडळी.. गोंधळ करू लागते.. देवाला मीच घरी घेऊन जाणार म्हणून भांडण सुरु होतात…)

वयोवृद्ध :- आता परेंत ज्या देवाचं देवपन नाकारत व्हतात…आता त्या देवाला घरी नेण्यासाठी भांडण लागलीयेत…हे पांडुरंगा!!!!

( तेवढ्यात एक कठोर स्वर कानी पडतो…थांबा…थांबा…थांबा )

विठ्ठल:- थांबा…मला विचारलंत का…आणि स्वतः भांडायला लागलेत.. अरे तुमच्या ह्याच भक्तीला कंटाळलोय मी!.. पुंडलिकाच्या भक्तीपायी.. मी युगे आठ्ठावीस.. न डागमगता उभाच आहे.. कधी काही शंका व्यक्त केली का…स्वतःला भक्त म्हणून घेतात तुम्ही माझी.. हीच का तुमची भक्ती…पुंडलिकाची सर तुम्हाला नाही यायची!…. त्याच्या पायाच्या धूळी चाही तुमच्या भक्तीचा स्पर्श नाही!…..अरे जीर्ण झालेलं माझं.. देऊळ.. माझं घर आहे…आणि माझ्याकडे तुम्ही पक्या घराचं वरदान मागतात…माझ्या मूर्तिसमोर छप्पन्न भोग….आणि कधी मी एखादं जीर्ण वस्त्र घालून तुमच्या दाराशी येतो तर मला हाकलून लावतात तुम्ही….कधी मुंगी बनून.. पेढा खाण्यासाठी येतो तर मला पळवून लावतात तुम्ही…कधी श्वान बनून माझा प्रसाद घेतो.. तेव्हा हुसकावून लावतात तुम्ही.. अरे सृष्टीच्या प्रत्येक अन प्रत्येक कनाकणात बसलोय मी…पन तुम्ही अन तुमची भक्ती फक्त माझ्या मूर्तिपरेंतच!…..(लखलखता प्रकाश हळू हळू कमी होतो) आणि विठ्ठल तेथून निघून जातो!

Continued……………..

Leave a Comment