Calendar सगळ्यांची मापं काढणारं!

Calendar… सगळ्यांची मापं काढणारं!

कॅलेंडर… सगळ्यांची मापं काढणारं!

  • दि.ना. बागुल
  • 31 डिसेंबर 2023
    आज पुन्हा इंग्रजी Calendar ने त्याची आकडेवारी बदलली.. अगदी मागच्या वेळेसारखी.. असो, मी तर फक्त कॅलेंडर बदलणार! अगदी फ्रँकली सांगतो कुणाला सांगू वैगरे नका.मी हि संकल्प केलाय.. एवढंच! आता काय संकल्प केलाय हेही जर मी तुम्हाला सांगितलं ; तर तो संकल्प राहिल व्हय! असो,
    सुरुवात कितीही कठीण असली तरीही ती सुंदर असते, आणि अन्त कितीही सुंदर असला तरीही पिडादायक ठरतो…हे ज्याचं त्याचं त्याने त्याच्या परिस्थितीनुरूप ठरवायचं.
    आज महत्वाचं वाटणार कॅलेंडर भंगारात गेलं…आणि त्याजागी नवीन Calendar अगदी दिमाखात आपल्या पानांच्या घड्या वाळत येतं होतं. जून कॅलेंडर मात्र रुसलं होतं.. काय करणार जीव जडला होता त्याचा त्या घरात. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीची टिपणी होती त्याच्यात. आईचा वाढदिवस, श्रेयसचा जन्म, आणि काही जिवलग खाना खुणाही होत्या, ते फक्त नातंच जोडणारं नव्हतं.. ते हिशेब लावणार हि होतं.. केव्हा आणि कधी किती पैसे दिलेत, याच मोजमाप होतं…असो भावुक झालात ना! माफ करा.. दिगंबर निर्जीव गोष्टीना देखील त्याच्या लिखाणात सजीव करतो.. असो.
    आपण देखील माणसं आहोत.. जस जुनं झालेलं कॅलेंडर आपण बाजूला टाकतो.. अगदी तसाच आताच्या धावपळीच्या जगात आपण माणसे तोडून फेकतो.. केलेंडर ला भाव भावना नाहीयेत.. पण माणसाला आहेत. कॅलेंडर ला भाव भावना असत्या तर त्याने 31 डिसेंबरलाच आत्महत्या!…माफ करा मानसिक हत्या केली असती!… आणि माणसाने?… असो.. माणुसही एक जिवंत कॅलेंडरच आहे.
    अगदी फ्रँकली सांगतो.. माणसे जपा! पैसा फक्त सरणाची विल्हेवाट लावेल. पण आपल्या साठी रडणारी माणसंच जर आपल्याकडे नसली तर आपलं मरणही व्यर्थ आहे… असो
    माणसाने माणसाची माणसासम वागणे एवढा जरी संकल्प केला तरी पुरे!
  • दि.ना. बागुल
  • 31 डिसेंबर 2023

1 thought on “Calendar सगळ्यांची मापं काढणारं!”

Leave a Comment