सरळसेवा भरती २०२३ Current Recruitment 2023

 सरळ सेवा भरती २०२३  Current Recruitment 2023

 सरळसेवा भरती – २०२३ गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग 

महाराष्ट्र शासन आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक आदिवासी विकास भवन, पहिला माळा, गडकरी चौक, जूना आग्रा रोड, नाशिक 

सरळसेवा भरती – २०२३ गट (ब) अराजपत्रित संवर्ग व गट क संवर्ग आदिवासी विकास विभागांतर्गत आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, नाशिक यांच्या अधिपत्याखालील तसेच नियुक्तो प्राधिकारी अपर आयुक्त, नाशिक/ठाणे/अमरावती/नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोटयातील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पध्दतीने दिनांक २३.११.२०२३ ते १३.१२.२०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.official Website:- https://tribal.maharashtra.gov.in 

Starting Date :- 23-11-2023

Last Date :- 13-12-2023 Night 23:55 

१) परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. २) ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित क्योमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. ३) स्पर्धात्मक परिक्षा स्थगित करणे, रद्द करणे, अशंत: बदल करणे, पदाच्या एकूण व संवर्गनिहाय संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील. व त्यांचा निर्णय अंतिम असेल. याबाबत कोणताही दावा करता येणार नाही. तसेच दर्शविण्यात आलेल्या समांतर आरक्षणाचा पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच राखीव प्रवर्गातील इतर पात्र उमेदवारांचा शासन विहित नियमानुसार विचार केला जाईल. सदरील पदभरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारी, उद्भवल्यास त्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांना राहतील.

Leave a Comment