कांदा उत्पादकांचा नाफेड वर मोर्चा Onion Strike Nafed

कांदा उत्पादकांचा नाफेड वर मोर्चा Onion Strike Nafed

News Nashik:- कांद्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. किमान ४० रुपये. “कांदा निर्यातबंधीचा निषेध असो, नाफेड हाय हाय अश्या बेधडक घोषणा देत शुक्रवारी कांदा उत्पादकांची नाफेड च्या कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला. कांद्याला चाळीस रुपये किलो भाव न मिळाल्यास नाफेड चे कार्यालय कांद्याने भरून टाकू असा इशारा शेतकर्यांनी दिला.

निर्यातबंदी नंतर पडलेले बाजारभाव तसेच नाफेड कडून कांदा खरेदीत होणारा घोटाळा याबाबत तक्रार करत विविध मागण्यांसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे हरसिंग ठोके, गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नाफेड Nafed कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

नाफेड व एनसीसीएफ ने बाजार समितीतून कांदा खरेदी करावा.क्विंटलला चार हजार रुपये भाव द्यावा, कांदा निर्यात खुली करावी, खरेदी केंद्रांच्या माहितीचा तपशील द्यावा.कांदा निर्यात खुली करावी.दोन वर्षांतील कांदा खरेदीचा तपशील जाहीर करून खरेदीतील तफावतीची सरकारी चौकशी व्हावी, कांदा अनुदान तत्काळ देण्यात यावे,अशा मागण्या शेतकऱ्यांनी केल्या, तसेच कंपन्यांकडून होणाऱ्या कांदा खरेदीच्या भ्रष्टाचाराला ‘नाफेड’चे अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

कांदा उत्पादक शेतकरी हतबल, कांदा भावात घसरण सुरूच!

कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे. Ref Lokmat

कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाला असून एकीकडे कांदा दरात झालेली घसरण दुसरीकडे उन्हाळ कांद्याची लागवड सुरु आहे. मात्र कांदा रोपे देखील महाग झाल्याचे चित्र आहे. केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयानंतर हा सलग तिसरा आठवडा असून आजच्या दिवशी देखील कांदा दरात घसरण सुरूच आहे. नाशिकच्या  पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज उन्हाळा कांद्याला सरासरी 1600 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. 

केंद्राच्या कांदा निर्यातबंदीनंतर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे शेतकरी दिवसरात्र काबाड कष्ट करून शेतात कांदा पिकवत असताना कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. आज नाशिक जिल्ह्यातील महत्वाची बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याला 1725 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर काल याच बाजारसमितीत 1800 रुपये दर मिळत होता. म्हणजेच आज पुन्हा 75 रुपयांनी कांदा घसरल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हळूहळू भाव वाढण्याऐवजी भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. 

कांदा दरात घसरण सुरूच 
– दरम्यान आज सकाळी लासलगावच्या विंचूर उपबाजारसमितीत झालेल्या कांदा लिलावांत लाल कांद्याला कमीत कमी 751 रुपये रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला, तर सरासरी केवळ 1725 रुपये दर मिळाला.

– पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत पोळ कांद्याला कमीत कमी 800 हजार रुपये दर मिळाला. उन्हाळी कांद्याची आवक आता बाजारसमित्यांमधून जवळपास घटत चालली असून दिवसाकाठी अवघे दीडशे ते दोनशे क्विटल उन्हाळी कांदा बाजारसमित्यांत दाखल होत आहे. पिंपळगावला उन्हाळ कांद्याला सरासरी 1600 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 

आज सकाळी झालेल्या लिलावादरम्यान सिन्नर – नायगाव बाजारसमितीत 311 क्विंटल लाल कांदा दाखल झाला. त्याला कमीत कमी म्हणजे 500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर सरासरी 1800 रुपये प्रति किटल दर मिळाला.

राज्यातील आजचे कांदा बाजारभाव जाणून घ्या.. 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमीदरजास्तीत जास्तदरसर्वसाधारणदर
कोल्हापूरक्विंटल800850025001500
छत्रपती संभाजीनगरक्विंटल263150018001150
चंद्रपूर – गंजवडक्विंटल640225030002500
लासलगाव – विंचूरलालक्विंटल1180075119001725
धाराशिवलालक्विंटल14140020001700
पंढरपूरलालक्विंटल18720030001800
सिन्नर – नायगावलालक्विंटल31150019001800
मनमाडलालक्विंटल200050018481600
पेनलालक्विंटल261300032003000
भुसावळलालक्विंटल24100015001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल4823001600950
शेवगावनं. १नग750160020002000
शेवगावनं. २नग700100014001000
शेवगावनं. ३नग328300900900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल850080022011751
कळवणउन्हाळीक्विंटल375120017001300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल38070019511600

Leave a Comment