आपली कृती आणि त्याची प्रतिक्रिया Runanubandh

आपली कृती आणि त्याची प्रतिक्रिया

ऋणानुबंध भाग 2 आपली कृती आणि त्याची प्रतिक्रिया,


स्वाती : अरे ! स्वप्नील आताची परिस्थिती अनुभवता मला तर एवढं नक्कीच कळून चुकलंय की, आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कामाचा मोबदला हा आपल्याला योग्य वेळी नक्कीच मिळतो, नाही का!
स्वप्नील : हो अगदी बरोबर, आपण केलेलं काम किंवा कृती, कर्म(karma) हे ज्या पद्धतीने दुसऱ्याला देतो तसच आपल्यला ते परत मिळत असत, कदाचित त्याहूनही जास्त, पण हे आपल्या कृती वर अवलंबून असत, समजा आज तू एका गरजू व्यक्तीची मदत करत आहेस, तसच त्याचा मोबदला म्हूणून तुलाही तुझ्या गरजेच्या वेळी कोणीतरी मदत करेल हे नक्की,

पण ती मदत आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळेल हे त्या परिस्थिती वर अवलंबून असत.
स्वाती : म्हणजेच tit for tat?
स्वप्नील : तस म्हंटल तरी चालेल पण , karma said, कर्माचा सिद्धांत सांगतो की आपण केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला हा आपल्याला नकळत मिळत असतो पण आपल्याला त्याची कधीच जाणीव होत नाही,
स्वाती : स्वप्नील तुझं म्हणणं पण बरोबर आहे, पण आपण एखाद्याला निस्वार्थी पणाने एखादी गोष्ट देतो,

म्हणजे एकप्रकारे त्याची मदत करतो, आणि जर त्या मदतीचा एखाद्याने गैफायदा घेतला तर त्यामध्ये पापाचे भागीदार आपण पण होतोना, मग त्याच फळही आपल्याला वेळ आल्यावर नकीच मिळत असणार,

आपल्याकडून नकळत झालेली चूक ही पण एक अपराधा सारखीच नाही का?
स्वप्नील : तुला महाभारतातला दनविर कर्ण माहीत आहे का?
स्वाती : मृत्युंजय!
स्वप्नील : हो अगदी खरं

कर्ण दररोज सकाळी सूर्या कडे तोंड करून सूर्याची आराधना करत असतो, आणि ही त्याची दिनचर्या असते

पण त्यातही त्याच एक पण असत की सुर्यदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी कोणी त्याच्याकडे काहीही मागितलं तरी तो ते काही ही न विचारता देईलयामध्ये कर्णाने हा विचार कधीच केला नव्हता, की आपण दिलेलं दान आपण ज्याला देतोय तो नक्कीच योग्य आहे का अयोग्य,
स्वाती : म्हणजे!
स्वप्नील : म्हणजे आपण निस्वार्थी पणाने एखाद्याला मदत करतोय, यामध्ये आपण काय योग्य आहे आणि काय अयोग्य याचा विचार करत नसतो, पण वेळ आल्यावर आपल्याला नक्कीच जाणीव होते, की आपण केलेली मदत ही नक्कीच योग्य होती की अयोग्य

पण आपण त्या परिस्थितीत एखाद्याची मदत करतोय तेव्हा आपल्याला त्या गोष्टीच समाधान नक्कीच मिळत
स्वाती : खरंच बरोबर आहे. म्हणजे आपली चांगली किंवा वाईट कर्म ही आपल्या कडे त्याच पद्धतीने परतही येत असत
स्वप्नील : हो, आणि हा कर्मा चा नियमही आहे

आपल्या भाषेत बोलायला गेल तर

न्यूटन चा तिसरा नियम Newton third low – for every action (force) in nature there is an equal and opposite reaction

म्हणजेच निसर्गातील प्रत्येक कृतीसाठी एक समान किंवा विरुद्ध प्रतिक्रिया असते,

म्हणजे प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असते,

स्वाती : correct….अगदी बरोबर

आग स्वाती कुठंय तू ! !अरे स्वप्नील बाय मी येते आई बोलावते आहे,

स्वप्नील : बा.. बाय.. आणि हो काळजी घे,…………

Leave a Comment