ऋणानुबंध लेखन मालिका|Runanubandh Lekhan Malika | Marathi Writing

ऋणानुबंध
लेखन मालिका
लेखक :- मयूर बागुल

प्रास्ताविक
प्रस्तुत ऋणानुबंध लेखन मालिका करमणूक पत्रांत प्रकरंणश: मी आपणास सुपूर्त करत आहे. माझे स्वलिखित ऋणानुबंध ह्या लेखन मालिकेतून स्वप्नील आणि स्वाती ह्या दोन पात्रांच्या मदतीने मी समाजजीवनाचे धडे, माणुसकी, विज्ञान, जग त्यांच्यातील घडामोडी संवादात्मक,चर्चा, वादविवाद, प्रेम, माणसाचं जीवन…. जास्त नाही पण थोडक्यात तरी मांडण्याचा यज्ञ केला आहे.

अनुक्रमणिका

अं.क्र.नाव
1ऋणानुबंध (भाग 1)
2आपली कृती आणि त्याची प्रतिक्रिया,
3प्रेम
4“आता पुढे काय?”
5आज सहजच….
6रंगपंचमी
7पृथ्वी
8ऋणानुबंध
9संघर्ष आणि जीवन…
10असच काहीस जीवनाबद्दल लिहतांना………….

ऋणानुबंध (भाग 1)


“Good morning, आई”
अरे! उठलास का ? “एवढ्या लवकर” आज सूर्यदेव पश्चिमेला उगलेत की काय? ‘बघू दे आधी बाहेर मला. आई काय मस्करी करतेय का माझी,
“छे मी आणि तुझी मस्करी नाही रे बाबा, असो
ते टेबलावर्ती मी तुझे कपडे ठेवलेत, ते घे आणि अंघोळ कर बघू,  ” हो ग आई!
                 स्वाती,,, आग स्वाती कुठेय तू, ही मुलगी पण ना खूपच आळशी झालीये दिवसेंदिवस. ना नाष्टा, ना देवबाप्पाच दर्शन” आधी मोबाइल लागतो तिला, “काय ग आई उगाच ओरडते माझ्यावर” तुझा लाडका स्वप्नील बघ अजून गोधडीतच असेल, त्यालापण बोलत जा की, “तो बघ आला तुझा लाडोबा” काय ग काय चुगल्या करतेय माझ्या, आई जवळ
                  अरे रे! भांडतात का विनाकारण, सकाळी सकाळी लोक देवाचं नाव घेतात आणि तुम्ही”” काय खर नाही तुमचं, असो स्वाती मी तुझा चहा टेबलावर ठेवलाय आणि स्वप्नील तुझा नाष्टा पण तयार आहे, तो खा आणि जा बघू कॉलेज ला,  आग आई किती वाढतेस बस झालं आता माझं पोट भरलय, काय हा मुलगा सकाळी सकाळी पोटभर नाष्टा केला म्हणजे, माणूस अगदी टवटवीत असतो. अन याच आपलं काहीतरीच, स्वप्नील sanitizer आणि मास्क आठवणीने घेऊन जा, मागच्या वेळेस विसरला होता तू ,अरे स्वतःसाठी नाही पण कमीतकमी दुसऱ्यांसाठी तरी वापरत जा, “हो आई घेतलंय सर्व, तू काळजी नको करू,
                 अंग स्वाती” तू नाही येत का कॉलेज ला
अरे नाही आज माझ ऑनलाईन लेक्चर आहे, so मी आज नाही येणार, बर आई येतो मी by…………..

नमस्कार लवकरच येतील तुमच्या भेटीला स्वप्नील आणि स्वाती,, 


ऋणानुबंध भाग 2
आपली कृती आणि त्याची प्रतिक्रिया,


                            
स्वाती :    अरे ! स्वप्नील आताची परिस्थिती अनुभवता मला तर एवढं नक्कीच कळून चुकलंय की, आपण केलेल्या चांगल्या किंवा वाईट कामाचा मोबदला हा आपल्याला योग्य वेळी नक्कीच मिळतो, नाही का!

स्वप्नील :    हो अगदी बरोबर, आपण केलेलं काम किंवा कृती, कर्म(karma) हे ज्या पद्धतीने दुसऱ्याला देतो तसच आपल्यला ते परत मिळत असत, कदाचित त्याहूनही जास्त, पण हे आपल्या कृती वर अवलंबून असत, समजा आज तू एका गरजू व्यक्तीची मदत करत आहेस, तसच त्याचा मोबदला म्हूणून तुलाही तुझ्या गरजेच्या वेळी कोणीतरी मदत करेल हे नक्की,
पण ती मदत आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळेल हे त्या परिस्थिती वर अवलंबून असत.

स्वाती :   म्हणजेच tit for tat?

स्वप्नील :   तस म्हंटल तरी चालेल पण , karma said, कर्माचा सिद्धांत सांगतो की आपण केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला हा आपल्याला नकळत मिळत असतो पण आपल्याला त्याची कधीच जाणीव होत नाही,

स्वाती :   स्वप्नील तुझं म्हणणं पण बरोबर आहे, पण आपण एखाद्याला निस्वार्थी पणाने एखादी गोष्ट देतो,
म्हणजे एकप्रकारे त्याची मदत करतो, आणि जर त्या मदतीचा एखाद्याने गैफायदा घेतला तर त्यामध्ये पापाचे भागीदार आपण पण होतोना, मग त्याच फळही आपल्याला वेळ आल्यावर नकीच मिळत असणार,
आपल्याकडून नकळत झालेली चूक ही पण एक अपराधा सारखीच नाही का?

स्वप्नील :   तुला महाभारतातला दनविर कर्ण माहीत आहे का?

स्वाती : मृत्युंजय!

स्वप्नील :   हो अगदी खरं
कर्ण दररोज सकाळी सूर्या कडे तोंड करून सूर्याची आराधना करत असतो, आणि ही त्याची दिनचर्या असते
पण त्यातही त्याच एक पण असत की सुर्यदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळी कोणी त्याच्याकडे काहीही मागितलं तरी तो ते काही ही न विचारता देईल
यामध्ये कर्णाने हा विचार कधीच केला नव्हता, की आपण दिलेलं दान आपण ज्याला देतोय तो नक्कीच योग्य आहे का अयोग्य,

स्वाती :   म्हणजे!

स्वप्नील :   म्हणजे आपण निस्वार्थी पणाने एखाद्याला मदत करतोय, यामध्ये आपण काय योग्य आहे आणि काय अयोग्य याचा विचार करत नसतो, पण वेळ आल्यावर आपल्याला नक्कीच जाणीव होते, की आपण केलेली मदत ही नक्कीच योग्य होती की अयोग्य
पण आपण त्या परिस्थितीत एखाद्याची मदत करतोय तेव्हा आपल्याला त्या गोष्टीच समाधान नक्कीच मिळत

स्वाती : खरंच बरोबर आहे. म्हणजे आपली चांगली किंवा वाईट कर्म ही आपल्या कडे त्याच पद्धतीने परतही येत असत

स्वप्नील :   हो, आणि हा कर्मा चा नियमही आहे

आपल्या भाषेत बोलायला गेल तर
न्यूटन चा तिसरा नियम Newton third low – for every action (force) in nature there is an equal and opposite reaction
म्हणजेच निसर्गातील प्रत्येक कृतीसाठी एक समान किंवा विरुद्ध प्रतिक्रिया असते,
म्हणजे प्रत्येक कृतीला प्रतिक्रिया असते,

स्वाती :   correct….अगदी बरोबर
आग स्वाती कुठंय तू ! !अरे स्वप्नील बाय मी येते आई बोलावते आहे,

स्वप्नील :   बा.. बाय.. आणि हो काळजी घे,…………

ऋणानुबंध(भाग 3)
प्रेम

स्वप्नील :   काय” ग स्वाती काय झालं एवढ्या विचारात का आहेस, कोणी काही बोलले का?

स्वाती :   अरे! नाही, पण माझ्या मनात खूप दिवसांपासून एक प्रश्न होता,

स्वप्नील :  काय?

स्वाती :    अरे एवढं विशेष काही नाही, पण
         (ये पण तू माझी खिल्ली उडवणार नाही ना,)
स्वप्नील: अग नाही काहीतरीच काय,

स्वाती :    अरे आज इंगळे सरांचं  लेक्चर होत
आणि त्यांनी आज आम्हला प्रेम काय असत यावर प्रश्न केला,आणि यावर वर्गातील सर्व विद्यार्थी हसायला लागले

स्वप्नील :   मग काय झालं

स्वाती :     मग काय होणार होत, सर खूपच चिडले सर्वांवर
पण नशीब सरांचं लेक्चर संपलं आणि पिटी चे सर आलेत,

स्वप्नील :    अरे रे पण सरांनी प्रश्न केलेला अपूर्णच राहिला की,

स्वाती :       पण सरांनी असा प्रश्न का विचारला असेल,
आणि जरी विचारला तर मग सर्व विध्यार्थी हसत का होते?

स्वप्नील :      त्यात एवढं काय आहे, सरांनी तुमच्या पुढच्या कवितेबद्दल संदर्भात्मक विचारणा केली असणार,
आणि दुसरं म्हणजे असा प्रश्न केल्यावर विध्यार्थी हसले याचा अर्थ असा की त्यांना प्रेम काय असत याची कल्पना सुद्धा नाहीये

स्वाती :   म्हणजे?

स्वप्नील :     आजच्या एकविसाव्या शतकात प्रेमाबद्दलची लोकांची विचारधारा, ही खूप काहीशी बद्दललीये,
प्रेम शब्दच ऐकला की त्यांच्या समोर फक्त एक कपल,
प्रेमात असलेले, किंवा प्रेमभंग झालेलं दृशेच येतात, याउलट, काही ठिकाणी तर प्रेमाबद्दलचा समज, विचारधारा काहीतरी वेगळीच असते, असो

स्वाती :        बरोबर, प्रत्येक माणसाची वृति, विचारधारा वेगळी असते, पन  याचा अर्थ असा नाहीना कि, माणसानी त्याचा अर्थच चुकीचा लावावा, जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट त्याच्या समजण्या पलीकडे असेन,
तर त्यानी एकतर ती समजून घ्यावी, नाहीतर त्यावर त्यांनी बोलूच नये,

स्वप्नील :        स्वाती, तुझं बोलणं एकाकी बरोबरही आहे, पण प्रत्येक माणसाची विचारधारा, विचार करण्याची क्षमता ही वेगवेगळी असते,

आता बघ ना श्रीकृष्णाच राधावर खूप प्रेम होतं, पण तेव्हाच्या परिस्थितीत त्या लोकांना ते अमान्य होत, पण बघणा आताच्या परिस्थितीत लोक त्याच प्रेमाच्या शपता घेतायेत,
काळ बदलला विचारधारा बदलली,

स्वाती :         म्हणजे काळ नुसार व्यक्तिची विचारधारा बदलते,

स्वप्निल :      हो, पन काळ कितीही पुढे गेला तरी सुद्धा तो प्रेमाची व्याख्या नाही बदलू शकत, ते universal constant, आणि universally proportional आहे, आणि हे मी नाही अध्यात्म सांगतं,

प्रेम हे एका आईच मुलावर, एका बहिणीच त्याच्या भावावर,एका गुरुच त्याच्या शिष्यावर, एका पत्नीचं तिच्या पतीवर, देवाचं त्याच्या भक्तांवर, असच असत
हे कुठंही बदलत नाही, हे त्या त्या परिस्थितीवर त्याप्रमाणे बरोबरच असत,

स्वाती :     अगदी बरोबर,
पण मानव जर प्रेमाबद्दल एवढा जागरूक आहे, एवढा प्रमाणबद्ध आहे, मग याबद्दल त्याचा गैरसमज का, आणि त्याला सर्व गोष्टी माहीत असून सुद्धा तो प्रेमाच्या विरोधात का असतो?

स्वप्नील :      हे बघ स्वाती, मानव हा कितीही पुढे गेला ना, तरी तो भावनांच्या, पलीकडे नाही जाऊ शकत,
ते म्हणतात ना की रणभूमीमधील युद्ध आपण जिंकूही शकतो, पण मनात चाललेलं युध्द, हृदयातला द्वंद्व, आपण जिंकूनही हरल्यासारखाच असतो,
आपल्याला आलेल्या अनुभवातून आपण काहीतरी शिकत असतो, आणि ती चूक पुन्हा होऊ नये याचीही काळजी घेतो,

प्रेमाला विरोध करण यामध्ये  माणसाचा गैरसमज नाहीये,
मानवाला आलेला अनुभव, समाजजीवणातून शिकलेले धडे, चांगले आणि वाईटाची पारख ही त्याला हे करण्यासाठी भाग पाडते,

स्वाती :      म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार मानवाचा प्रेमावर विरोध नाहीये, आणि प्रेम करणाऱ्यांवर सुद्धा,
मानवाचा विरोध हा समाजामधल्या अर्धवट विचारधारेचा आहे,
समाजात चाललेल्या वाईट घटनांना पाहता, त्याला त्याच्या आपुलकीच्या माणसांची काळजी वाटते,

आणि म्हणूनच तो प्रेमाला किंवा प्रेम करणार्यांना प्रोत्साहन नाही देत.

स्वप्नील :      हो,

स्वाती  :     स्वप्नील खरच, आज तू अगदी सुंदर आणि प्रभावीपणे प्रेमाबद्दलची संकल्पना स्पष्ट केली आहेस,
आता उद्याच्या लेक्चर मध्ये इंगळे सर काय शिकवतील ते तर मला नाही माहीत, “पण एवढं नक्कीच की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता माझ्या कडे आहे”

(एवढं बोलून दोघेही हसू लागतात)


ऋणानुबंध भाग 4
“आता पुढे काय?”

[मागील भागा मध्ये आपण पाहिलं की स्वाती ने केलेल्या प्रश्नाचं स्वप्नील योग्य प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा प्रयन्त करतो, आणि स्वतीच्या प्रश्नाच निरसन होत.]

(स्वप्नील आणि स्वाती यांची नुकतीच दहावीची बोर्डाची परीक्षा संपते, आणि आता ते फायनली रिलॅक्स होतात, आपल्या शाळेतल्या छोट्या छोट्या आठवणी सांभाळत ते आपल्या पुढील भविष्याचा विचार करीत बसतात.)

स्वप्नील :     काय ग स्वाती आता पुढे काय करणारेस,

स्वाती :     “आता तुसुद्धा!

स्वप्नील :     का? काय झालं

स्वाती :      परीक्षा संपल्या पासून सर्वांच्या तोंडून मी हेच एकतेय, की पुढे काय करशील म्हणून, आता तर हे एकूणच राग येतो ,

(स्वप्नील च तिच्या बोलण्याकडे पाहिजे तेवढं लक्ष नव्हतं
तो, आपला न्युज पेपर वाचण्यातच व्यस्थ असतो)

स्वाती  :       अरे माझ्या कडे तरी लक्ष दे,  काय न्युज पेपर वाचतोय,

स्वप्नील :        आग तू वाचलं का, चीनच्या वुहान मध्ये व्हायरल इन्फेक्शन (कोविड)मूळे हजारो लोकांचा मृत्यू झालाय,

स्वाती :          काय?

स्वाती  :        एका संसर्ग मुळे एवढ्या लोकांचा जीव कसकाय जाऊ शकतो, छे” खोटं आहे सगळं, आणि कोविड सारख काही नसेलच उगाच हे न्युज वाले आपल्या प्रसिद्धी साठी काही ही सांगत बसतात,

स्वप्नील :         आग हो खरंच”
तुला विश्वास नसेल पण आपल्या देशातही असले रुग्ण आढळून आलेत, आणि नेमकी हा व्हायरस कसकाय बरा होईल यावर शास्त्रज्ञांचं संशोधनही चालुये, वास्तविकता आणि शोकांतिका ही आहे की, आपण याला सर्वसामान्य समजतोय, पण यासारखं भयावह काहीही नाहीये,

स्वाती :        असेलही, एक संसर्ग*
पण माझ्या नजरेत हा मानसिक रोग आहे, जो आधी माणसाच्या मानसिकतेवर हल्ला करतो, आणि मग त्याच्या शरीरावर,

स्वप्नील  :     असो,
            या सर्व घटनेचा आपल्या परिक्षेवर परिणाम झाला नाही तेच बर, आपल्या परीक्षा लवकरात लवकर संपल्या, thank god…

( Two  Months letter…)
(दोन महिन्यांनतर…)

स्वाती :         अरे स्वप्नील तू बघितलं का, जीवनावश्यक गरजा वगळता, पूर्णपणे लोकडाऊन करण्यात आलाय,
“आता पुढे काय?”

स्वप्नील  :      अग हो! मी पण बघितलंय, भारतात कोरोना ची साखळी इतकी वाढलीये की त्याला कंट्रोल करण खूप अवघड झालंय, आणि त्यामुळे भारत सरकारने कडक निर्बध आणि लोकडाऊन ची घोषणा केलीये,

स्वाती :        होणा, पण तुला अस नाहिका वाटत की या अचानक झालेल्या बंध मुळे सामान्य जनतेवर किती कठीण परिस्थिती येऊ शकते ते’,

स्वप्नील :     आग हो खरंच
तुझं म्हणणं ही बरोबर आहे, पण या परिस्थितीत याशिवाय दुसरा पर्याय तरी होता का,मानवाने याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, आणि प्रत्येकाला सहकार्य केले पाहिजे,

(दोन महिन्यांनंतर)

“बघता बघता दोन महिने झालीयेत आणि अजूनही ऍडमिशन आणि करियर विषयी काहीच विचार केला नाहीये, आणि त्यातल्या त्यात हा कोरोना मधाच्या मधमाश्यांसारखा चिकटून बसलाय”
आणि त्यात हे लोकडाऊन उघडायचा नावच घेत नाहीये” दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी काही गंभीर्याच राहील नाहीये,

स्वप्नील  :       काग काय झालं ऍडमिशन घेतलं का कुठे,

स्वाती  :         (रागात)होणा!  घेतलंय ना ऍडमिशन “स्टे होम युनिव्हर्सिटी” मध्ये,
आई योग्य प्रकारे पोळ्या करायला शिकवते आणि भाऊ ती पोळी बघून वेगवेगळ्या देशांचा शोध लावतो,
(स्वप्नील मोठ्याने हसू लागतो)

स्वाती :        हो ना हास अजून!

स्वाती :         तू एवढा हसतोय, तू घेतलं का ऍडमिशन?

स्वप्नील :       नाही हं मी कुठेच घेतलं नाहीये ऍडमिशन,
फक्त एवढाच विचार आहे मनात की “आता पुढे काय”?……………to be continued

आज सहजच थोडं लिहावंसं वाटलं म्हणून…..

     संध्याकाळचे 8 वाजलेत आताच घरी आलेलो, खांद्यावरची बॅग बाजूला ठेवली, आणि फ्रेश होऊन जेवणासाठी बसलेलो, सर्व काही नेहमीप्रमाणे…..पण आज काहीस नवीन वाटत होतं,  स्वतामध्येही आणि वातावरणातही काहीसा बदल जाणवत होता, जेवण झालं आणि वर टेरेस वर थोडा फेरफटका मारायला गेलो, लागलीच एक वही आणि पेन सोबतच घेऊन आलो होतो. रात्रीचा काळोख आणि चारही बाजूने चांदण्यांची लूक-लूक चालू होती, पक्षीही कदाचित आता आपापल्या घरट्यांमध्ये गेली असावीत, सर्व काही शांत अगदी शांत,,,,तेव्हाच कुठून तरी असंख्य प्रकारचे स्वर ऐकू येऊ लागले, एवढ्या शांत वातावरणात कोण असेल बर हा शांतता भंग करणारा, मुळीच तो सापडत नव्हता. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून तो माझ्यामधलाच एक होता,………..अहो’ खरच रात्रीच्या निरव निरागस वातावरणातील हा आवाज आत्मीयतेचा होता ‘कदाचितच.
हरवलेल्या मनाच्या कोपर्यातला कधी न ऐकू येणारा हा आवाज होता. स्वत: मध्ये हरवलेला, कुठेतरी दडलेला, हा फक्त एक एकांत होता, जो ह्या जगातलाच नव्हता, तो निस्वार्थी होता, तो निर्मम होता, तो सत्याचा पाठलाग करणारा होता, तो  स्वताशीच भांडणारा  होता, जगाच्या पलीकडे अगदी ते शितीजही ठेंगण वाटाव, आणि त्या क्षितिजाचा पाठलाग करत तो मुठीत यावा असाच काहीसा हा भास होता, कधी खूप दूर जाव लागत स्वताचाच शोध घेण्यासाठी, हरवलेली वस्तू  सापडेलही कदाचित पण  हरवलेलं मन शोधनं खूप कठीण आहे. असो,
खूप दिवस झालेत स्वताला भेटलो नव्हतो, जीवनाचा प्रत्येक क्षण हा फक्त दुसर्या साठीच असतो, त्यात आपण कितपत जगतो हे कधीच आपल्याला कळत नाही, दुसर्या साठी जगत-जगत आपण स्वतासाठी कधीच उरत नाही, आज स्वतालाच लिहायला गेलो पण लिहिता नाही आल, खूप  खाडाखोड झाली, पण स्वताला कदाचित मांडता नाहि आल, मी स्वताला कितपत ओळखतो हे मला तेव्हा कळाल, स्वताचा जीवनाचा सारांश मांडताना आपण स्वत साठी किती जगलो हे तेव्हा कळत, जीवन हे इतक सोप आहे का?  शिक्षण, नोकरी, लग्न……… Whatever  व्वा छान यालाच जीवन म्हणतात का? असो जीवन हे एवढच सोपय मग अश्या जीवन जगण्याला तरी काय अर्थ आहे, जीवनाचा अर्थ मुळात हाच आहे का कधी विचार केला तर आपणही असाच जीवन जगतो, आणि जगणार असच ना, हा जीवन जगण्याचा एक Criteria असावा, असो,
जीवन फक्त एवढच आहे का ? म्हणजे यापलीकडे जीवन म्हणजे काय हे कुणीच सांगू नाही शकत का, yaar Life एकदाच मिळते याला मनसोप्त जगल पाहिजे जीवनाच्या शेवटच्या क्षणाला एक अपेक्षा फक्त अपेक्षा राहावी अशी एकही अपेक्षा नसावी, अस जगाव माणसाने,  जीवनातला प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय झाला पाहिजे असच त्या क्षणाला स्मराव माणसाने, ……………..आणि हा प्रतेकामधला आत्मीयतेचा आवाज आहे,
दुसर तिसर विशेष काही नाही आज सहजच थोडं लिहावंसं वाटलं म्हणून…              – मयूर बागुल

रंगपंचमी


                  “अरे ! किती वेळ झालाय आवरा ना पटकन अजून खूप तयारी करायची आहे. “गंप्या, अन्या, सार्थक काय चाललंय तुमचं” माहीत नाही का आज रंगपंचमी आहे ते ? मला वाटलंच हे वेळच लावणार म्हणून मी आधीच सर्व तयारी करून ठेवली, मागच्या रंगपंचमी ला आम्ही सर्व मित्र  चिपळूणकरांच्या वाड्यात गेलो होतो. यावेळेलाही त्यांच्याच इथे जायचंय रंगपंचमी खेळायला.
                  आज २ एप्रिल २०३०, वर्षानुवर्षे कसे ढळतात कळतच नाही. सकाळचे 8 वाजलेत ‘मी रंगपंचमीच्या तयारीसाठी सार्थक च्या वाड्यात आलोय, बाकी मित्र पण इथेच आहेत. खूप काही बदलून गेलय एवढ्या वर्षांमध्ये. आधीची नवलाई , स्वच्छंदी जगणारे आम्ही आणि बरच काही, मी पण काय आताभावनांमध्ये वाहून चाललोय,असो”
                   “अरे! गंप्या आवरलं का तुझं? आणि येताना त्या दोघांनाही घेऊन ये, आणि हो sanitizer ची बॉटल पण असू दे सोबत, माफ करा अरे विसरलोच आता काय गरज त्या sanitizer आणि मास्क ची मी पण खूप विसरभोळा आहे.’आता कशाला यांची गरज’
                            तुम्हला माहीत आहे का? आजपासून तब्बल ९ वर्षांपूर्वी भयंकर महामारी पसरली होती,  अरे ती महामारी कशाची राक्षस होता. “मानवनिर्मित राक्षस” पण एवढं मात्र खरंय, की माणसांना त्यांनी चांगल्याच प्रकारे धडा शिकवला. सगळीकडे मृत्यू, नि थैमान केलं होतं , जीवन हा एक पाण्याचा बुडबुडा असतो हे अगदी खरच, सगळी कडे जमावबंदी सगळी कडेच बंद, कोण्ही कोरोना संसर्ग मुळे मरत होत. तर कोण्ही भूकमरी मुळे’ हे सगळं अगदी असह्य होत. अंत: मानवाला त्याच्या मर्यादा कळाल्या, मला अजूनही आठवत!
                 अखेर मानवाला त्याची चूक कळली, आणि त्यानंतर तो सुधरला,
“अरे! अन्या आलास का…? ते बागेत आपली बॅट आणि बॉल पडलाय बघ तेपण घेऊन ये आपण यानंतर क्रिकेट खेळू,
अन्या   – अरे! मार्मिक आज रंगपंचमी आज कशाला क्रिकेट आज फक्त रंपनचमी.
मार्मिक   – “अरे हो; पण विसरलास का आपण दरवर्षी रंगपंचमी खेळल्यानंतर  क्रिकेट खेळतो ते”
अन्या’  “हो पण यावेळेस नको ना”
तुला माहीत आहे’ मागच्या वेळेस माझ्या कडून त्या वाड्यातल्या उर्मी आंटीच्या खिडकीचा काच फुटला होता.  खूप रागावले होते ते.
मार्मिक –  (यावर मार्मिक, गंप्या आणि सार्थक मोठमोठ्यने हसू लागतात)
अन्या’ – हो! करा माझी मस्करी आता. जा मी येतच नाही
तुमच्याबरोबर.
मार्मिक – “अरे रागावलास का? , आम्ही  मस्करी केली.
(एवढेबोलून सगळे आता सगळे चिपळूणकरांच्या वाड्यात जाण्यासाठी निघाले.)……………………..

ऋणानुबंध भाग ६                 
पृथ्वी

स्वाती आणि स्वप्नील कॉलेज ला जातांना…………………………
(आकाशाच्या चारही बाजूंकडून फक्त प्रदूषण प्रदूषण आणि फक्त प्रदूषण आणि दुसर काय यावरच काहीस निरीक्षण करताना स्वप्नील आणि स्वाती आज विचार करत होते. आता पुढे…
स्वप्नील :- काय ग स्वाती ! आज मराठीचे पेंडसे सरांनी काही अभ्यास दिला होता का, आग कालच्या गडबडीमध्ये मी विसरलोच बग?
स्वाती :- हो ! पेंडसे सरांनी वाढते प्रदूषण आणि पृथ्वी यावर आपापले विचार लिहून आणायला लावले होते, तु नाही लिहलेत ना?
स्वप्नील :- नाही
स्वप्नील :- विषय तर खूप महत्वाचा आहे पण यार ह्या विषयावर फक्त बोलून काय होणार.
स्वाती :- होणा,
स्वप्नील :- यार स्वाती सर्वच फक्त बोलतात कि प्रदूषण इतकं वाढलाय आणि झाडे लावा वातावरणात होणारे बदल या विषयांवर पण कोणीही यावर अंमलबजावणी करत नाही.
स्वाती ;- हो हेही अगदी खरंय, पण आपणच केलेल्या चुका आपणच सुधारल्या पाहिजेत नाहीका
वाढत प्रदूषण, ग्लोबल वार्मिंग, वातावरणीय बदल, वाढणारी रोगराई आणि बरच काही, पृथ्वीवर असलेला प्रत्येक जीव हा पृथ्वीचा एक अविभाज्य घटक आहे.त्यामुळे आपल हे कर्तव्य आहे कि आपण त्याच संगोपन तरी कराव, बदल हा निसर्गाचाच नियम आहे, पण मानव एवढा बदलेल ,,,,,,,,,,,,,,अशक्य”
Progress is impossible without change, and those who cannot change their minds cannot change anything.
स्वप्नील :- हो खरंय मानवाची प्रगती आणि त्यातून निसर्गाचा कळत नकळत पणे होणारा ऱ्हास  ह्या दोन्हीही बाजू गृहीत धरल्या पाहिजेत.

सकाळ २१/०८/२०२२
ऋणानुबंध
भाग – ११


अजून बराच काळ जायचा होता…डोक्यावरचा सूर्य पार जीवाची  लाहि-लाहि करत  होता..असाच निघालो होतो पाठीवर पश्चातापाच ओझ घेऊन..खूप वर्ष झालीत आई वडिलांना भेटलो नव्हतो. फोन वर बोलन व्हायचं तेवढच.. मला २० वर्ष झालीत मी अमेरिकेला होतो ,शिक्षणासाठी दूर गेलेलो मी कधी माझ्या मात्राभूमिला विसरलो मलाही कळल नाही, मी शहरातल्या नवलाइला भुललो होतो, आणि माझ्याच मात्रभूमीला पारखा झालो, आज अचानक बाबांचा फोन आला..त्यांच्या आवाजात एक गंभीरता होती , आणि थोडा संयम, होता, पण त्या फोन मध्ये मला आईचा आवाज येत नव्हता, मी  बाबांना केविलवाण्या स्वरात विचारल “बाबा आई कुठाय!!  मला बोलायचंय तिच्याशी..एवढ बोलून अचानक फोन कट झाला..असो
पार डोंगराआड एक छोटस घर आहे माझ…आणि तिथे एका छोट्याश्या घरात..विठू आणि रुक्मिणी राहतात ..जणू  माझ पंढरपुरच आहे ते..त्यांनी माझ्या  साठी काय केल  याची तुलनाहि मी करू शकत नाही..आणि त्याची परतफेडही..मी इंजिनियर व्हाव हे त्याचं स्वप्न होत..आणि ते मी आज पूर्ण केलय.. सर्वात आधी मी माझ्या  विठू आणि रुक्मिणीला  त्याचं स्वप्नातलं घर बनवून देणार..आणि मग फक्त त्यांच्या साठी जगणार..घरी गेल्या गेल्या आधी आईच्या हाताची ती वांग्याची भाजी आणि भाकरी खाणार.. खूप वर्ष झालीत..आईच्या हाताची चवीला मुकलो होतो,,घरी गेल्या गेल्या आई तर माझी परेडच घेणार.. “किती नाजूक झालायस काही खात पीत होतास कि नाही..आणि रागवत बसणार..पण काहीही असो आईच्या रागवण्यातही प्रेमच असत…निरागस प्रेम. बाबा तर माझी गळा भेटच घेतील अगदी  कडाडून मिठी मारतील…आल्या आल्या सून बघतील माझ्या साठी..असो…अजून एक कोसावर राहिलंय माझ घर..  माझा आनंद तर गगनात मावेनासा झालाय..कधी एकदा घरी पोहोचेल असच झालय मला…

आता पुढे –


एक हलकासा श्वास घेत..माझ्या घरच्या पायवाटेवरून निघालो..वाड्यातली कुत्री भुंकत होती माझ्यावर, त्यांना गप करत घरात शिरलो..“ आई’’’ आई’’’ बाबा’’’ बाबा’’’’ कुठ आहात तुम्ही मी आलोय बघा..अचानक…कुठेतरी एक गंभीर आवाज आला खु…खु.. करत एक मंद स्वर माझ्या कानी पडला…. “बाळ
बाबा  बहुतेच खूप आजारी होते…मला बघून त्यांनी कुणास ठाऊक..काहीतरी उशी  खाली ठेवलं..आणि मला जवळ घेत म्हणाले… “बाळ  कसा आहेस तू? थांब जरा मी तुला पाणी आणतो..खूप दमला असशील तू…परक्या देशातून आलायस मायदेशात…जरा पाहुणचार करूदेत मला.. “ काय बाबा अस काय बोलतायेत..मी आहे ना मी घेऊन घेईन पाणी तुम्ही बसा..तुमची तब्बेत बरी नाहीयेत बाबा, तुम्ही मला सांगितल का नाही ..मी कोणी परका आहे का? …ते असुदेत बाबा.. आई कुठाय ? काही दिसत नाहीये…थांबा वाड्यात असणार मी बघतो…खूप भूक लागली आहे…आई””””आई  कुठाय..हे बघ मी आलोय,  वाड्यात तर नाहीये, बहुतेक रानात गेली असणार… आई””””आई  कुठाय..आई …. बाबा आई कुठाय’ बाबा मंद आवाजात हृदयाचा ठाव घेत…तो मला पाहून लपवलेला उशी खालचा फोटो मला दाखवायला लागले…आणि बोलले
“ हा बघ बाळ हि बघ तुझी आई कितीवेळची तुझी वाट बघतेये आणि तू आहेस तर इकडे तिकडे बघतोयस…बाळ असच तुझी वाट बघत तुझी आई त्या दारावर दरोज वाट बघत उभी राहायची..आणि दररोज मी ‘तो  आज येईल ह्या शब्दाने तिला धीर द्यायचो..बघ ना बाळ आज तू आलायस पण तुझी आई !!!!!!!!!!!!!

ऋणानुबंध…………..

संघर्ष आणि जीवन…
एक व्यक्ती एका वाटेने जात होता मार्ग तसा खडतर होता. तरीसुद्धा तो चालत होता. रस्ता नागमोडी होता रस्त्याने चालता चालता त्याच्या मार्गावर काही छोटे दगड आलेतत्यानी त्या दगडांना दुर्लक्षित केलं आणि त्यावरून उडी मारून पुढे जाण्याचा प्रयन्त केला. परत जरा पुढे गेला आणि त्यापेक्षा जरा मोठे दगड वाटेत आले त्यांनी त्यानंही बाजूला न करता पुढे जाण्याचा प्रयन्त केला. अस त्याच चालूच होत त्यानंतर तो एका वळणावर येऊन पोहोचला पण आता त्या वाटेत खूप मोठा दगड होता. त्याला त्यावरून उडी पण मारता येत नव्हती आणि तो दगड बाजूला पण करता येत नव्हता, आता तो काय करणार तिथेच बाजूला एक  झाड होत तो त्याच्याखाली थोडा अरामासाठी बसला आणि विचार करू लागला की आता काय करायचंत्यानी खूप विचार केला आणि त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण आता ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत अधिपण कोणीतरी येऊन गेलय. जस मी वाटेतले दगड बाजूला न करता पुढे गेलो तसच माझ्या अधिपण येथे कोणीतरी येऊन गेलय आणि तोपण हा दगड म्हणजेच हे विघ्नपार न करता मागे फिरला असावा ‘तो स्वतःच विचार करू लागला की माझं चुकलं जीवनातल्या छोट्या छोट्या विघ्नाना मी दुर्लक्षित केलं आणि जेव्हा एक मोठं विघ्नमाझ्यासमोर आलं तेव्हा त्याला पार करण्याचं सामर्थ्य माझ्या मध्ये कुठून येणार…….
तसच आपल्या जीवनाचहीआहे जीवनातल्या छोट्या छोट्या विघ्नांशी लढा तरच तुम्हाला तुमच्या पुढे येणाऱ्या मोठं मोठ्या विघ्नाना पार करण्याच सामर्थ्य येईलखरंतर तो वाटेतला मोठा दगड मुळात तो दगड नव्हता त्याच दुसर नाव संघर्ष होत,आणि त्या दगडाला पार केल्या नंतरचा आनंद म्हणजेच जीवन होत.

आता पुढे –

मी,
असच काहीस जीवनाबद्दल लिहतांना………….


     सायंकाळचे ६ वाजलेत एक कप चहा घेतला. जीवनाच्या  प्रवासामधला हा एकांत आणि मी त्याचबरोबर एक चहा, बस! दुकान ओढलं आणि मकरंद काकांच्या इथे एक चहा घेतलेला, दिवसभराचा ताण फक्त त्या एका चहाच्या कपाने दूर व्हावा आणि आणि त्यामध्ये जीवनाचा आनंद मिळावा… वा ! छानच कि,
त्यानंतर मी घराकडे निघालो, पाठीवर जबाबदारीच ओझ, आणि हातात एक पुस्तक होत, बस एवढच होत जीवन, थंडीचे दिवस होते सगळी कडे निरव शांतता, आणि त्यात पक्ष्यांचा गलबललाट,दिवसभर फेरफटका मारून दमलेली हि चिमणी-पाखरे आता आपापल्या घरट्यांकडे जात होती, जणू आसमंताला निरोप देत होती,दिवसभर शेतीत काबाडकष्ट करून थकलेला शेतकरीराजा चार्याची पेंढी डोक्यावर ठेऊन आपल्या घराकडे जात होता,दिवसभर तार वाटून थकलेले विचारे पोस्टमन पेंडसे काका आपले बिढार घेऊन ट्रिंग- ट्रिंग करत घराकडे जात होते, विचारी चिमुकली मुंगी  डोक्यावर मोठा साखरेचा कन घेऊन आपल्या सहकारीना वाट दाखवत होती, सर्व काही नेहमी प्रमाणे, आज जरा घरी जाण्यासाठी उशीर झाला, आई खूप रागावली, आणि पत्नीने तर उचल बांगडीच केली माझी, घरात पाय ठेवताच जाम परेडच घेतली, गहिवरलेल माझ मन आणि मी सर्व निमुटपणे ऐकत होतो, फ्रेश झालो, आणि डोंगराआड गेलेल्या माझ्या बाबांना नमस्कार करत मी जेवणाला बसलो, “काय झाल हे वाक्य वाचताना प्रश्न ? चिन्ह तर आल नाहीना,,,,वाटलच होत, मी पाच वर्षाचा असतांना माझे बाबा एका दुर्घटनेमध्ये देवा घरी गेले म्हणजेच “डोंगराआड” असे मला लहान असतांना सांगितले जायचे तेव्हा हे खूप चांगल वाटत होत कि माझे बाबा  डोंगराआड गेलेत तर येऊ पण शकतात हि एक आशा मनात राहायची, जसा जसा मोठा झालो तेव्हा ठरवल कि मीपण डोंगराआड जाणार आणि बाबांना शोधून आणणार, अजून थोडा मोठा झालो तेव्हा कळाल, कि ते खूपच दूर गेलेत आपल्या पासून, अश्या ठिकाणी, कि ज्याचा आपण पाठलाग पण करू नाही शकत. असो…
जेवण झाल, आणि बसलो…लहान मुलगा हातात एक वही आणि पेन घेऊन पळत आला…बाबा बाबा” आज गुरुजींनी जीवनावर आणि झाडावर निबंध लिहायला लावलाय…सांगा न बाबा उद्या गुरुजी शिक्षा देतील नाही लिहील तर ….अरे! रे हो थांबशील का थोडा.


“प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी || उरले शेवटी लावी तुका” काय झाल बाबा”, “अरे काही नाही, बस इथे, जीवन आणि झाडे ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत बाळ..आपल जीवन टिकवण्यासाठी झाडे टिकवणे खूप महत्वाच आहे, झाडे नाही निसर्ग नाही तर आपल पण अस्तित्व शून्य आहे.अगदी तुझा तो गावीक सरांचा गणितातला शून्य आहे न तसाच, जर झाडांना आणि निसर्गाला आपल्या जीवनातून वजा केलस तर आपल जीवन जगण्याची कल्पना पण नाही करू शकत, असो..

आता पुढे –

Leave a Comment