मी मोठा झालो असलो तरी! |Short Story Marathi|

मी मोठा झालो असलो तरी!Short Story Marathi

Short Story But Its Not Story :- साधारणता सकाळचा प्रहर होता. खिडकीतून एक सोनेरी प्रकाशजोत आपली वाट काढत मध्ये येत होती.. मलाही थोडी उब मिळेल म्हूणन मीही खिडकीच्या बाजूला खुर्ची टाकून निवांत बसलो. हा माझा चहा पिण्याचा वेळ होता.. आणि मी कधीही पुस्तक आणि चहा मध्ये compromise करत नसतो. आईला मोठ्याने आवाज दिला, आई कदाचित घरकामात व्यस्त असावी म्हणून का तिने उत्तर दिले नाही, म्हणून मीच बाहेर बघायला गेलो. बघतो तर सकाळी सकाळी तिच्या बहिणीचा call चालू होता. म्हणजे माझी मावशी. झाला खंडोबा. आता मीच चहा करण्याचं ठरवलं.. कारण आईला आता चहा टाकायला सांगणं म्हणजे यमदुताला स्वतःहून आरोळी दिल्या सारखं होईल.. असो


चहा मोजकाच करायचा होता.. कारण तोही उरला तर आई ओरडेल माझ्यावर. त्यामुळे Finally मी चहाच न पिण्याच ठरवलं, असो आई कुठे काय करते! तर ठरलं आता मी टपरिवर जाऊनच चहा पिणार. चहा पिण्यासाठी टपरीवर जाणं हे मला मुळीच मान्य नव्हतं, कारण मी काही एक कारण नसताना टपरीवर जाऊन चहा पिला हे जर आईला कळालं. तर माझं जेवनही बंद होणार. त्यामुळे मी माझ्या भावना नियंत्रित करत मागे फिरत घरचा रस्ता गाठला. असो
आज कपाटात धूळ खात पडलेली वही मला घावली…वही जुनाट होती…जीर्ण झालेली आणि आठवणी सुद्धा! तिला बघितल्या वर मी 30 वर्षाचा लठ्या…. अगदी 18 वर्षाचाच झालो.. वहीच मुखपृष्ठ माझ्या पराक्रमांची ग्वाही देत होतं. मला त्यावरची धूळ काढण्याइतकाहि धीर नव्हता…पण उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग असं म्हंटल तरी चालेल हो मला.. असोत.
यावेळी मी दिगंबर नव्हतो…अर्थातच मी पूर्णपणे दिग्या झालो होतो.
माझं आगामी पुस्तकं.. ज्याचं लिखाण काम मी आत्ताच हाती घेतलं होतं ते म्हणजे “मी मोठा झालो असलो तरी!”…त्याचं लिखाण तरी होईल म्हणून त्याचं लिखाण करत बसलो. तेवढ्यात आईने आवाज दिला. “अरे दिगू चहा घेतलास का. मी नाही म्हणत मान डोलावली.
मला स्वर्गात जातानाही एवढा आनंद होणार नाही. तेवढा आनंद मी आता अनुभवत होतो…अर्थातच आता दिगंबर…दिगू झाला होता
To be continued…

कॅलेंडर….Short Story Marathi

31 डिसेंबर 2023
Short Story But Its Not Story :- आज पुन्हा इंग्रजी कॅलेंडर ने त्याची आकडेवारी बदलली.. अगदी मागच्या वेळेसारखी.. असो, मी तर फक्त कॅलेंडर बदलणार! अगदी फ्रँकली सांगतो कुणाला सांगू वैगरे नका.मी हि संकल्प केलाय.. एवढंच! आता काय संकल्प केलाय हेही जर मी तुम्हाला सांगितलं ; तर तो संकल्प राहिल व्हय! असो,
सुरुवात कितीही कठीण असली तरीही ती सुंदर असते, आणि अन्त कितीही सुंदर असला तरीही पिडादायक ठरतो…हे ज्याचं त्याचं त्याने त्याच्या परिस्थितीनुरूप ठरवायचं.
आज महत्वाचं वाटणार कॅलेंडर भंगारात गेलं…आणि त्याजागी नवीन कॅलेंडर अगदी दिमाखात आपल्या पानांच्या घड्या वाळत येतं होतं. जून कॅलेंडर मात्र रुसलं होतं.. काय करणार जीव जडला होता त्याचा त्या घरात. प्रत्येक महत्वाच्या गोष्टीची टिपणी होती त्याच्यात. आईचा वाढदिवस, श्रेयसचा जन्म, आणि काही जिवलग खाना खुणाही होत्या, ते फक्त नातंच जोडणारं नव्हतं.. ते हिशेब लावणार हि होतं.. केव्हा आणि कधी किती पैसे दिलेत, याच मोजमाप होतं…असो भावुक झालात ना! माफ करा.. दिगंबर निर्जीव गोष्टीना देखील त्याच्या लिखाणात सजीव करतो.. असो.
आपण देखील माणसं आहोत.. जस जुनं झालेलं कॅलेंडर आपण बाजूला टाकतो.. अगदी तसाच आताच्या धावपळीच्या जगात आपण माणसे तोडून फेकतो.. केलेंडर ला भाव भावना नाहीयेत.. पण माणसाला आहेत. कॅलेंडर ला भाव भावना असत्या तर त्याने 31 डिसेंबरलाच आत्महत्या!…माफ करा मानसिक हत्या केली असती!… आणि माणसाने?… असो.. माणुसही एक जिवंत कॅलेंडरच आहे.
अगदी फ्रँकली सांगतो.. माणसे जपा! पैसा फक्त सरणाची विल्हेवाट लावेल. पण आपल्या साठी रडणारी माणसंच जर आपल्याकडे नसली तर आपलं मरणही व्यर्थ आहे… असो
माणसाने माणसाची माणसासम वागणे एवढा जरी संकल्प केला तरी पुरे!

2 thoughts on “मी मोठा झालो असलो तरी! |Short Story Marathi|”

Leave a Comment