चांदवडच्या नेमिनाथ जैन संस्थेला कृतज्ञता पुरस्कार SNJB

चांदवडच्या नेमिनाथ जैन संस्थेला कृतज्ञता पुरस्कार

SNJB
SNJB
Ref. Sakal News 

पुणे: ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत ‘सेल्फी विथ माटी’ या विश्वविक्रमी मोहिमेत लक्षणीय योगदानाबद्दल उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना नेमिनाथ जैन संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य महावीर पारख, प्रा. तुषार चांदवडकर आणि आकाश महावीर पारख. शेजारी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर व कुलसचिव डॉ. विजय खरे.नाशिक, ता. २८ : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित ‘मेरी माटी-मेरा देश’ मोहिमेत ‘सेल्फी विथ माटी’ या गीनिज बुकात विश्वविक्रम केलेल्या मोहिमेतील लक्षणीय सहभागाबद्दल चांदवडच्या नेमिनाथ जैन संस्थेचा कृतज्ञता पुरस्काराने गौरव करण्यात आला. ‘मेरी माटी-मेरा देश’ या मोहिमेत मोलाचे योगदान देणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा गौरव सोहळा पुणे येथील मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिवाजी सभागृहात नुकताच पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नाशिक जिल्ह्यातील नेमिनाथ जैन संस्थेने या मोहिमेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल संस्थेला कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेच्या प्रबंध समितीचे सदस्य सीए महावीर पारख, प्रोफेसर तुषार चांदवडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू असे पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळी संयोजक राजेश पांडे यांनी नेमिनाथ जैन संस्थेचा आणि विशेषतः आबड-लोढा-जैन महाविद्यालयाचा गौरवाने उल्लेख केला. पुरस्काराचा स्वीकार करून सोए महावीर पारख यांनी नेमिनाथ जैन संस्थेला सदिच्छा भेट देण्याचे निमंत्रण चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. तुषार चांदवडकर यांनी पुढाकार घेऊन २० हजार फोटो या मोहिमेत पाठविले, त्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, मानद सचिव जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, सहसचिव झुंबर भंडारी, विश्वस्त मंडळाचे आणि प्रबंध समितीचे सदस्य आणि महाविद्यालयाचे समन्वयक कांतिलाल बाफणा, प्रशासकीय अधिकारी पी. पी. गाळणकर यांनी अभिनंदन केले आहे.
Ref. Sakal News 

Leave a Comment